हमखास नफा मिळण्यासाठी ऊस लागवडीकडे वळा : चव्हाण

हमखास नफा मिळण्यासाठी ऊस लागवडीकडे वळा : चव्हाण
Published on

खोडद, ता. १३ : ‘‘पिकांचे सतत गडगडणारे बाजारभाव आणि शेतीत गुंतवलेले भांडवलही निघत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. या तुलनेत उसाला मिळणारा चांगला एफआरपी, कमी भांडवल व श्रम, तसेच हमखास नफा मिळवून देणारे पीक म्हणजे ऊस आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे वळावे,’’ असे आवाहन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक विकास चव्हाण यांनी केले.

पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. सुरू हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात त्यांनी ऊस शेतीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण, सरपंच रेश्मा बोटकर यांच्यासह विविध पदाधिकारी व ऊस उत्पादक उपस्थित होते. उपसरपंच रामदास तट्टू यांनी सूत्रसंचालन तर रूपेश डेरे यांनी आभार प्रदर्शन मानले.

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे यांनी २०२६-२७ या हंगामासाठीचे ऊस लागवड धोरण, हंगामानुसार ऊस वाणांची निवड, एआय तंत्रज्ञानाधारित ऊस शेती तसेच कारखान्याच्या विविध योजनांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com