निमगाव सावा येथे रंगला खो-खोचा थरार

निमगाव सावा येथे 
रंगला खो-खोचा थरार
Published on

खोडद, ता. ३ : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत १२ संघांनी (मुले, मुली) सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. वेगवान चढाया, अचूक बचाव आणि रणनीतीपूर्ण खेळ यामुळे स्पर्धा रंगतदार झाली.
श्री पांडुरंग स्पोर्ट क्लब यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेच्या उद्‍घाटनावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, प्रशिक्षक शिरीन गोडबोले, आंतरराष्ट्रीय पंच किरण वाघ, राष्ट्रीय खेळाडू नरेश अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, प्राचार्य प्रल्हाद शिंदे आदी उपस्थित होते. मुलांच्या गटात इंदापूरच्या (जंक्शन) नंदिकेश्वर विद्यालयाने निमगाव सावा येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाला पराभूत करीत विजय मिळवला. तर, मुलींच्या गटात चिंचवडच्या श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा विद्यालयाने वरकुटेच्या श्री शिवाजी विद्यालयावर मात केली.
विजेत्या संघांना अनुक्रमे अकरा हजार १११ ते पाच हजार ५५५ रुपये अशी रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आले. क्रीडा संचालक तानाजी फुलमाळी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्पर्धेचे आयोजनासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com