निमगाव सावा रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

निमगाव सावा रस्त्यावरील 
धुळीमुळे नागरिक त्रस्त
Published on

खोडद, ता. २४ : जांबुत फाटा ते निमगाव सावा (ता. जुन्नर) दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीने वाहनचालक आणि नागरिक हैराण झाले आहेत. अपघाताचा धोका टाळण्यासाठी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर नियमित पाणी फवारावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
जुन्नर तालुक्यातील या मार्गाचे सध्या काँक्रिटीकरण व रुंदीकरण सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने कच्च्या भरावावरून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धूळ उडत आहे. याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसत असून, डोळ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही श्वसनाचा त्रास होत आहे. याशिवाय, परिसरात सूचना फलक आणि वेग मर्यादा दर्शविणारे फलक नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

02162

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com