खोडदमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

खोडदमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त 
विविध धार्मिक कार्यक्रम
Published on: 

खोडद, ता. ७  : जुन्नर तालुक्यातील  खोडद  गावात नवरात्रोत्सवानिमित्त ग्रामदेवता श्री  जगदंबा  मातेचा नवरात्रोत्सव रविवारी (ता. ११) पासून सुरू होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती श्री मुक्ताबाई जगदंबा मंदिर ग्रामदैवत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप थोरात व उपाध्यक्ष कुंडलिक गायकवाड यांनी दिली.
देवस्थानचे सचिव कृष्णाजी गायकवाड म्हणाले, ‘‘रविवार (ता. ११) ते सोमवारपर्यंत (ता. १९) श्री मुक्ताबाई जगदंबा मंदिर ग्रामदैवत देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. खोडद गावात नवरात्रोत्सवाच्या काळात गरबा, दांडिया खेळला जात नाही. नऊ दिवस कीर्तने आयोजित केली जातात.’’
देवस्थानचे सहसचिव चंद्रकांत पोखरकर म्हणाले, ‘‘घटस्थापनेच्या दिवशी सकाळी  जगदंबा मातेला चंडिका स्नान घालून अभिषेक करून मुखवट्यांची मिरवणूक काढली जाते व नंतर घटस्थापना होते. अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असताना गावातील सर्व लहान थोर मंडळी भक्तिभावाने सहभागी होतात. नवरात्रोत्सवाच्या काळात रोज पहाटे काकडा भजन, सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम महाराज गाथेवरील भजन, सायंकाळी हरिपाठ, त्यानंतर महाआरती, रात्री हरीकीर्तन त्यानंतर महाप्रसाद व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले जातात. दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण गावातून   जगदंबा मातेच्या पालखीची मिरवणूक काढली जाते.’’
रविवारी (ता. ११) भास्कर महाराज भाईक, सोमवारी विशाल महाराज खोले, मंगळवारी रोहित महाराज शेवाळे, बुधवारी देवराम महाराज गायकवाड, गुरूवारी कांचनताई जगताप, शुक्रवारी गणेश महाराज जगताप, शनिवारी अश्विनीताई टाव्हरे, रविवारी तुकारामशास्त्री मुंडे यांची अनुक्रमे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन सेवा होणार आहे. सोमवारी (ता. १९) रंगनाथ महाराज नाईकडे यांचे सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी होमहवनाचा कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com