गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त
दौंड शहरात धार्मिक कार्यक्रम

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दौंड शहरात धार्मिक कार्यक्रम

दौंड, ता. ८ : दौंड शहरात श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गुरुवार (ता. ९) पासून पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट दिनानिमित्त ५१ जोडप्यांच्या हस्ते श्री गणेश लक्ष्मी याग होणार आहे.

शहरातील कॅनरा बॅंक शाखेशेजारील जीर्णोद्धार सुरू असलेल्या श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत विविध भजनी मंडळांकडून भजन सेवा होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मुकुंद बादरायणी हे स्वर समर्थ अभंगवाणी सादर करणार आहेत, तर १२ फेब्रुवारी रोजी योगेश तपस्वी यांची सात वाजता भजन संध्या होणार आहे. सोमवारी (ता. १३) सकाळी श्रींचा अभिषेक, ५१ जोडप्यांचा श्री गणेश-लक्ष्मी याग, प्रकट अध्याय वाचन आणि सायंकाळी ५ ते ७ दरम्यान पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी दिली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com