‘वंदे भारत एक्सप्रेस’ला 
दौंडमध्ये नसणार थांबा

‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दौंडमध्ये नसणार थांबा

Published on

दौंड, ता. ९ : रेल्वे प्रशासनाने सवयीप्रमाणे दौंडकरांच्या तोंडाला पाने पुसत पहिल्या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दौंड जंक्शन रेल्वे स्थानकावर थांबा दिलेला नाही. निदर्शने होऊ नये, याकरिता पहिल्या दिवशी फक्त स्वागत करण्याकरिता थांबा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथून ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे लोकार्पण होणार आहे. परंतु, मागणी असतानाही या एक्सप्रेसला दौंड येथे थांबा नाकारण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी असे थांबे घेत एक्स्प्रेस दौंड येथे न थांबता सोलापूरपर्यंत धावणार आहे. पूर्णपणे वातानुकूलित अशा ‘वंदे भारत’मधून दौंड-पुणे-दौंड दरम्यान प्रवास करणारे दैनंदिन प्रवासी प्रवास करणार नसल्याचे स्पष्ट आहे. परंतु, ‘वंदे भारत’ दौंड येथे थांबल्यास दौंड रेल्वे स्थानकावरून मुंबई व सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होऊन वेळेची बचत होणार आहे. दौंडसह शेजारील बारामती, इंदापूर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील प्रवाशांना देखील या एक्सप्रेसचा लाभ होऊ शकतो.
याबाबत दौंड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक जयनाथ त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी फक्त लोकार्पणाच्या दिवशी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दौंड येथे थांबा आहे. त्यानंतर प्राप्त वेळापत्रकानुसार दौंड येथे थांबा नाही. भविष्यात थांबा मिळू शकतो व वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.