Wed, March 29, 2023

दौंड येथे टॅंकरच्या धडकेत महिला ठार
दौंड येथे टॅंकरच्या धडकेत महिला ठार
Published on : 14 February 2023, 4:58 am
दौंड, ता. १४ : दौंड शहरात राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना टॅंकरच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली. दौंड पोलिसांनी याबाबत आज (ता. १४) माहिती दिली. गीताबाई ऊर्फ जनाबाई वसंत पाटोळे (वय ५७, रा. ससाणेनगर, श्रीगोंदा, जि. नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी (ता. १३) रात्री मनमाड-दौंड-फलटण-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील नगर मोरी चौकात हा अपघात झाला. गीताबाई पाटोळे या महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील टॅंकरच्या धडकेत त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर चालक टॅंकर रस्त्यावर सोडून पळून गेला. दौंड पोलिस ठाण्यात गीताबाई पाटोळे यांचे नातेवाईक संदीप बुलाखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात टॅंकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.