दौंडकरांची करवाढीतून सुटका
दौंड, ता. १६ : दौंड नगरपालिकेने शासनाच्या आदेशानुसार सुधारित संकलित मालमत्ता कर आकारणी केली आहे. नगरपालिकेने शासनाच्या आदेशाने शुल्क आकारणी केली असून, कोणतीही करवाढ केलेली नाही, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांनी शुक्रवारी (ता. १६) माहिती दिली. नगरपालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या मालमत्तांकरिता सन २०२२-२०२३ ते सन २०२६-२०२७ या कालावधीसाठी सुधारित संकलित मालमत्ता कर आकारणीची कर निर्धारण यादी प्रकाशित केली आहे. नगरपालिकेच्या सन २०१८ पर्यंत एकूण १५ हजार ९१४ मालमत्ता होत्या व सर्वेक्षणानंतर ३५३१ मालमत्तांना कर आकारणी करण्यात न आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता कर निर्धारण करिता एकूण १५ हजार ९१४ मालमत्ता निश्चित केल्या आहेत. त्यानुसार कर निर्धारण करण्यासाठी मालमत्ताधारकांना मालमत्तेचे छायाचित्र व कर विवरणासह नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. नोटिशीत सुधारित संकलित मालमत्ता कर आकारणी करताना निवासी मालमत्तांकरिता ३६० रुपये उपयोगकर्ता शुल्क आकारले असून, ते शासनाच्या आदेशानुसार आकारले आहे, अशी माहिती संतोष टेंगले यांनी दिली.
सुधारित संकलित कर आकारणी यादीतील ठरविलेल्या मूल्यास किंवा निर्धारणास ज्या कोणास सूचना किंवा आक्षेप घ्यावयाचे असतील, त्यांनी आपल्या सूचना व आक्षेप विहित वेळेत दौंडनगरपालिका कार्यालयात लेखी स्वरूपात पुराव्यासह दाखल करावेत, असे आवाहन संतोष टेंगले यांनी केले.
१५ कोटींची थकबाकी
दौंड नगरपालिकेची एकूण कर थकबाकी १५ कोटी ७२ लाख २७ हजार ७४१ रुपये इतकी आहे. नगरपालिका प्रशासनाची दिरंगाई, उदासीनता आणि थकबाकीदारांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने थकबाकी वसुलीचे प्रमाण जेमतेम ३५ टक्के इतके आहे. चालू आर्थिक वर्षाची कर मागणी ४ कोटी ७८ लाख १७९१ रुपये इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

