दौंडमध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर कारवाई

दौंडमध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर कारवाई

Published on

दौंड, ता. ३ : दौंड तालुक्यातील एका नागरिकाने ११२ या पोलिसांच्या टोल फ्री कमांक्रावर दूरध्वनी करून जुगार अड्ड्याची माहिती दिली. त्यानंतर दौंड पोलिसांनी तेथे छापा टाकून ऑनलाइन मटका जुगार अड्डा चालविणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत बोरावकेनगर चौकात गुरुवारी (ता. २) सायंकाळी चार जण ऑनलाइन मटका जुगार खेळत असल्याची माहिती एका नागरिकाने ११२ या पोलिस मदत व तक्रार निवारणासाठी असलेल्या नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने खातरजमा करून बोरावकेनगर येथील एका पत्र्याच्या शेडमधील अड्ड्यावर छापा टाकला. त्यात एक टॅब, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जुगार अड्डा चालविणारे अथर्व बाबूराव जाधव (वय २०) व हरीश सर्जेराव धुमाळ (वय १९, दोघेही रा. गोपाळवाडी रस्ता, दौंड) यांना ताब्यात घेत आले. पोलिस हवालदार संजय कोठावळे यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध जुगार अड्डा चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.