दौंडमध्ये उद्यापासून पाणीपुरवठा बंद

दौंडमध्ये उद्यापासून पाणीपुरवठा बंद

दौंड, ता. १४ : दौंड नगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्ती करण्यासाठी गुरुवार (ता. १६) ते शनिवार (ता.१८ ) असा
तीन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. याबाबत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागप्रमुख स्मिता गाडे यांनी मंगळवारी (ता. १४) माहिती दिली.
नगरपालिकेचा साठवण तलाव ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या जलवाहिनीस अनेक ठिकाणी गळती झाल्याने दुरुस्ती करण्याकरिता तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. जलवाहिनीची दुरुस्ती असल्याने टॅंकरने केला जाणारा पाणीपुरवठा देखील या कालावधीत होणार नाही. रविवारी (ता. १९) नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
दौंड शहरासह लिंगाळी, गोपाळवाडी, सोनवडी व गार (ता. श्रीगोंदा, जि. नगर) ग्रामपंचायत हद्दीत सध्या दिवसाआड एकवेळ ७० लाख लिटर पाण्याचे वितरण केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com