विवाहितेचा विनयभंग,
दौंडमध्ये गुन्हा दाखल

विवाहितेचा विनयभंग, दौंडमध्ये गुन्हा दाखल

दौंड, ता. १४ : दौंड शहरात एका विवाहितेचा पाठलाग करण्यासह तिच्या घरापर्यंत जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दौंड शहरातील एका विवाहिता कामावर जात असताना आणि परतत असताना शॅंकी नेमचंद जैन (वय ३७ , रा. नेने चाळ, दौंड) हा तिचा चार महिन्यांपासून पाठलाग करीत होता. तसेच, दोन वेळा विवाहितेच्या घरापर्यंत जात त्याने लज्जास्पद वर्तन केले. त्यानंतर मोबाईलवरून कॉल करून आणि संदेश पाठवून त्याने त्रास दिला होता. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला. त्याच्यावर मटका जुगाराचे आकडे घेतल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com