दोन शिकाऱ्यांची 
वन कोठडीत रवानगी

दोन शिकाऱ्यांची वन कोठडीत रवानगी

दौंड, ता. ११ : गोपाळवाडी (ता. दौंड) येथील राखीव वनक्षेत्रात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन शिकाऱ्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. वनविभागाने दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक जिवंत घोरपड जप्त केली आहे.
दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गोपाळवाडी येथील राखीव वनक्षेत्र परिसरात ९ जून रोजी गोरख अंबादास जाधव (वय ५७, रा. पोथरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), भरत जनार्दन जाधव (वय ३४, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) या दोन शिकाऱ्यांना वन विभागाने अटक केली होती. त्यांच्याकडून एका जिवंत घोरपड जप्त केली. तसेच त्यांनी वनक्षेत्रात एका सशाची शिकार केल्याचे आढळून आले. वनक्षेत्रात शिकारीसाठी दोन्ही शिकाऱ्यांनी दोन श्वान, लोखंडी कोयता, लोखंडी गज आणि दोरी सोबत आणले होते. शिकारीसाठी वापरलेली एक दुचाकी देखील जप्त केली.
वन विभागाने १० जून रोजी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्ज नामंजूर करीत, त्यांना पुढील तपासाकरिता तीन दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com