दौंड येथील बाजारात कांदा सहा महिन्यानंतर ३००० रुपये पार
दौंड , ता. १२ : दौंड तालुक्यात सहा महिन्यानंतर कांद्याने प्रतिक्विंटल तीन हजार रुपये बाजारभावाचा टप्पा पार केला आहे. केडगाव येथील उपबाजारात कांद्याची ७२९५ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान १००० रुपये तर कमाल ३६०० प्रतिक्विंटल, असा असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात कांद्याची ५४६३ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान ७०० रुपये तर कमाल २७०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात १३ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याची ३८३१ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान १२०१ तर कमाल ४५०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता. त्यानंतर २० डिसेंबर रोजी कांद्याची ४८२५ क्विंटल आवक झाली व प्रतवारीनुसार किमान ७०० रुपये तर कमाल २५०० प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाल्याने बाजारभाव तब्बल दोन हजार रुपये प्रतिक्विंटलने कोसळले होते.
केडगाव उपबाजारात २० डिसेंबर ते १० जून दरम्यान कांद्याचे दर २७०० रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेले नाही. मात्र ११ जून रोजी कांद्याने सहा महिन्यानंतर प्रथमच तीन हजार रुपयांचा टप्पा पार करीत प्रतवारीनुसार कमाल दर ३६०० रुपये गाठल्याने कांदा उत्पादकांना किंचित दिलासा मिळाला आहे. डिसेंबर २०२३ ते १० जून २०२४ या कालावधीत केडगाव मध्ये एकूण २ लाख ६० हजार ३६६ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.
कांद्याचा बाजारभाव व आवक
महिना किमान (रु.) कमाल (रु.) आवक (क्विंटल)
डिसेंबर २०२३ ७०० ५२०० १६०५०
जानेवारी २०२४ २५० २७०० २०४४१
फेब्रुवारी २०२४ ३०० २७०० २२८९७
मार्च २०२४ ४०० २००० ७०२१९
एप्रिल २०२४ ४०० १८०० ६६८५३
मे २०२४ ४०० २५०० ५११४८
१० जून २०२४ ७०० ३६०० १२७५८
कांदा उत्पादकांना आर्थिक फटका
केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे दर धडाधड कोसळले. सर्वसामान्य ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवत निर्यातबंदी लादल्याने ग्राहकांना कांदा स्वस्तात उपलब्ध झाला. परंतु त्यामुळे कांदा उत्पादकांचे सर्व आर्थिक गणित बिघडून ते आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर निर्यातबंदी लागू करून उत्पादकांच्या विरोधानंतर निर्यात शुल्क आकारणी केल्याने कांदा उत्पादकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला. निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांद्याचे दरांमध्ये वाढ न झाल्याने केंद्र सरकारला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
03123
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.