विजेचे खांब पाडल्याने 
गिरीमच्या दोघांवर गुन्हा

विजेचे खांब पाडल्याने गिरीमच्या दोघांवर गुन्हा

Published on

दौंड, ता. २ : महावितरण कंपनीचे वीजवाहिन्यांसाठी असलेले खांब पाडून त्याचे नुकसान केल्याप्रकरणी गिरीम (ता. दौंड) येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गिरीम येथील शेरीवस्तीमध्ये ३० जून रोजी सकाळी हा प्रकार घडला. सोपान विठ्ठल जाधव यांनी महावितरणचे वीजवाहिन्यांसाठी असलेले काँक्रिटचे तीन खांब ट्रॅक्टरच्या साह्याने पाडले, तर एक लोखंडी खांब वाकवून त्याचे नुकसान केले. तसेच, ओम नारायण जाधव यांनी दगडाच्या साह्याने विजेचा एक काँक्रिट खांब फोडून त्याचे नुकसान केले. या प्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अमित धोत्रे यांनी दौंड पोलिस ठाण्यात १ जुलै रोजी फिर्याद दाखल केली. त्यानुसार सोपान जाधव व ओम जाधव (दोघेही रा. गिरीम) यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.