लोको पायलटकडून तरुणीवर बलात्कार

लोको पायलटकडून 
तरुणीवर बलात्कार
Published on

दौंड, ता. ३० : दौंड शहरात एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी रेल्वेच्या एका वरिष्ठ सहायक लोको पायलट विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीला कोंडून मारहाण केली जात होती.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी माहिती दिली की, विकास कोमलकुमार पंथी (वय ३७, रा. ओम शांती अपार्टमेंट, गजानन सोसायटी, दौंड), असे संशयित आरोपीचे नाव आहे. दौंड रेल्वे स्थानकात नियुक्त असलेल्या विकास पंथी याचे एका तरुणीशी परिचय झाला होता. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विकास याने तरुणीला चौफुला (ता. दौंड) व दौंड- पाटस रस्त्यावरील लॅाज येथे वेळोवेळी नेत बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
विकास याचे लग्न झाल्याची माहिती मिळताच तरुणीने त्याला जाब विचारला असता तिला सदनिकेत कोंडून ठेवण्यात आले. तिच्याकडील मोबाईल संचातील सर्व डाटा नष्ट करून तिला मारहाण करण्यात आली. दौंड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २९) रात्री तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार विकासकुमार याच्याविरुद्ध बलात्कार करणे, चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा हा यवत (ता. दौंड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने पुढील तपासाकरिता यवत पोलिसांकडे वर्ग केला आहे, अशी माहिती दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com