दौंड येथे गव्हाच्या बाजारभावात वाढ

दौंड येथे गव्हाच्या बाजारभावात वाढ
Published on

दौंड, ता. ३ : दौंड तालुक्यातील गव्हाची आवक वाढण्यासह बाजारभावात प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाची ५८८ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २२०० तर कमाल ३३०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव तेजीत आहेत. केडगाव व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहेत. नवरात्रोत्सवामुळे पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.

कोथिंबिरीची ५८०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ७०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची २८९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ४०० तर कमाल १५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ५८८ २२०० ३३००
ज्वारी ४५६ २०५० ३२००
बाजरी ६६४ १९०० ३२००
हरभरा ०५१ ४५०० ७२००
मका ०९५ २००० २६००
उडीद ०८७ ६००० ७२००

-----
बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-३२०, आले-४००, गाजर-३००, काकडी-१५०, भोपळा-२००, कोबी-११०, फ्लॅावर-६००, टोमॅटो-३००, हिरवी मिरची-६००, भेंडी-२८०, कार्ली-३००, दोडका-४००, वांगी -४००, शिमला मिरची-४७०, शेवगा-६००, घेवडा-३००.

कांदा बाजारभावात घसरण
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून दरात प्रतिक्विंटल नऊशे रुपयांची घट झाल्याने कांदा उत्पादक चिंतातूर झाले आहेत. कांद्याची ५२७१ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान २५००तर कमाल ४२०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

केडगावात लिंबाची आवक घटली
केडगाव येथे लिंबाची आवक घटली असली तरी बाजारभाव घसघशीत वाढ झाली आहे. पितृपक्ष पंधरवड्यात लिंबाला मागणी वाढली होती व नवरात्री सणाच्या दरम्यान ती कायम राहण्याची शक्यता आहे. लिंबाची ३१ डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान १२०१ व कमाल २३५० रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com