दौंड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल

दौंड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल

Published on

दौंड, ता. ५ : दौंड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील सोनवडी येथे रेल्वे पुलाच्या कामासाठी वाहतूक सोमवारी ( ता. ७) सलग अकरा तास बंद ठेवली जाणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
मध्य रेल्वेचे दौंड येथील कार्य निरीक्षक सुमंत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. दौंड-नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील सोनवडी (ता. दौंड) हद्दीतील नानासाहेब पवार वस्ती ते पवार पॅलेस दरम्यान असणाऱ्या दौंड-मनमाड लोहमार्गावरील रेल्वे पुलाचे लोखंडी गर्डर बदलण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी दौंड मार्गे नगर कडे जाणारी दुचाकी, रिक्षा, कार, जीप व अन्य लहान वाहनांची वाहतूक दौंड रेल्वे उड्डाण पूल-वायरलेस फाटा-नानवीज ते नानवीज फाटा मार्गे सोनवडी भीमा नदीवरील पूल, या मार्गाने वळविली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कुरकुंभ वरून दौंड मार्गे नगर जाणाऱ्या एसटी बस, ट्रक, टॅंकर व अन्य अवजड वाहनांनी दौंड- पाटस-चौफुला मार्गे पुढे पुणे-नगर महामार्ग किंवा काष्टीकडे (ता. श्रीगोंदा) जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com