दौंड तालुक्यात तूर ८४०० रुपये क्विंटल
दौंड, ता. १४ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात तुरीची आवक झाली आहे. तुरीची ४७ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ७६०० रुपये; तर कमाल ८,४०० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह यवत व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहेत. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली. बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव तेजीत आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ९,२६२ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८,२७५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १,२०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूची ७६७ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
केडगाव येथे लिंबाची ९१ डाग आवक झाली. प्रतवारीनुसार किमान २७० व कमाल ४५० रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे. मागील आठवड्यात लिंबाची ९१ डाग आवक होऊन प्रतवारीनुसार किमान २०१ व कमाल ४०१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला होता.
शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ४८९ २३०० ३४११
ज्वारी २६८ १७५० ३५००
बाजरी ५६० २००० ३१५१
हरभरा ०१४ ५३०० ६३००
मका २११ १८०० २२५०
उडीद ०२८ ५५०० ७०१०
मूग ०२९ ५८०० ६५००
तूर ०४७ ७६०० ८४००
भाजीपाला, फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे ः प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर : बटाटा-३००, आले - ५००, गाजर-४००, पेरू-१५०, काकडी-१५०, भोपळा-१००, कोबी-२००, फ्लॅावर-१२०, टोमॅटो-३००, हिरवी मिरची-३००, भेंडी-५००, कार्ली-३५०, दोडका-४५०, वांगी-२५०, शिमला मिरची-६००, घेवडा-५००, गवार-९००, लिंबू-३५०, मका कणीस-१८०.
टोमॅटो, काकडी व वांगीच्या दरात घट
टोमॅटोची १३२ क्विंटल आवक झाली. प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ३०० रुपये असा दर मिळाला. काकडीची ५६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल १५० रुपये, असा दर मिळाला. तर वांगीची ४५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल २५० रुपये, असा दर मिळाला.
कांद्याच्या दरात घट
दौंड बाजार समितीच्या केडगाव येथील उपबाजारात कांद्याची आवक वाढली. दरात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची घट झाली आहे. कांद्याची ७,२५६ क्विंटल आवक झाली. प्रतवारीनुसार किमान १,२०० रुपये; तर कमाल ६५०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील
आठवड्यात कांद्याची १,१८५ क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतवारीनुसार किमान ०८०० रुपये; तर कमाल ७,००० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

