दौंडमध्ये जुगारप्रकरणी 
चौघांवर गुन्हा दाखल

दौंडमध्ये जुगारप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Published on

दौंड, ता. ४ : दौंड रेल्वे वसाहतीमधील एका बंद घरामागे पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांच्या एका पथकाने शहरातील कुरकुंभ मोरीजवळ घंटे चाळ येथील जुगार अड्ड्यावर २ मार्च रोजी ही कारवाई केली. जुगार खेळणारे अक्षय मनोहर गायकवाड (वय ३१, रा. जगदाळे वस्ती, लिंगाळी), जितेंद्र ज्ञानोबा साळुंखे (वय ५५, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, दौंड), गणपत सुवालाल ठाकूर (वय ६५, रा. पासलकर वस्ती, लिंगाळी) व राजू ज्ञानदेव ओहळ (वय ५२, रा. घंटे चाळ, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख बाराशे रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. अंमलदार संजय कोठावळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com