दौंड तालुक्यात ज्वारीची आवक घटली

दौंड तालुक्यात ज्वारीची आवक घटली
Published on

दौंड, ता. ४ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात ज्वारीची आवक घटली आहे. बाजारात ६३३ क्विंटल आवक झाली. ज्वारीस प्रतवारीनुसार किमान २००० तर कमाल ४००० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची एकूण ७२८ क्विंटल आवक झाली होती.

दौंड मुख्य बाजार आणि यवत येथील उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहेत. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली तर बाजारभाव तेजीत आहेत. पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव येथील उपबाजारात कांद्याची १३४२६ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान १००० तर कमाल २८०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ९२३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० तर कमाल ७५० जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ७०२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये जुडी बाजारभाव मिळाला. शेपुची ५४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल ६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. कांदा पातीची १७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल ६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.

केडगाव येथे लिंबाची ४३ डाग आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार किमान ९५१ व कमाल २०७१ रुपये प्रतिडाग असा बाजारभाव मिळाला आहे.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू १२५६ २४०० ३४००
ज्वारी ०६३३ २००० ४०००
बाजरी ०२३२ २३०० ३४००
हरभरा ०२१७ ५००० ५५००
मका ००७७ २००० २२५०
मूग ०००२ ५००० ६०००

बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२००, आले-४००, गाजर-३००, काकडी-२१०, भोपळा-१२०, कोबी-७५, फ्लॅावर-१५०, टोमॅटो-१८५, हिरवी मिरची-८५०, भेंडी-६००, वाटाणा-३५०, कलिंगड-११५, खरबूज-२५०.


कोबी, टोमॅटो व हिरव्या मिरचीच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात कोबीची ६६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ३५ तर कमाल ७५ रुपये असा दर मिळाला. टोमॅटोची १९८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १८५ रुपये असा बाजारभाव मिळाला. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५०० तर कमाल ८५० रुपये असा बाजारभाव मिळाला.

खरबूज व कलिंगडची आवक सुरू
दौंड मुख्य बाजारात खरबुजाची ८९ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २५० रुपये असा बाजारभाव मिळाला. कलिंगडाची ५७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल ११५ रुपये असा
बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com