दौंडमधील दोन छाप्यांत 
सहा जुगारींवर कारवाई

दौंडमधील दोन छाप्यांत सहा जुगारींवर कारवाई

Published on

दौंड, ता. १२ : दौंड शहरात दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या एकूण सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी माहिती दिली की, या पहिल्या कारवाईत मंगळवारी (ता. ११) बंगला साइड येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. त्यात जुगार खेळणारे कमलेश सुरेश बेहराणी (वय ५०, रा. गोवा गल्ली, दौंड), मार्कस बाबुराव गायकवाड (वय ४८, रा. तेलुगू कॅालनी, दौंड) व नीरज विक्रम मांझी (वय १९, रा. रेल्वे चाळ, दौंड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार संजय कोठावळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
दुसऱ्या कारवाईत मंगळवारी दुपारी भीमा नदीकाठी एका वीट भट्टीजवळील जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. त्यात जुगार खेळणारे प्रकाश सिताराम सोनवणे (वय ६५), रवींद्र दगडू साळवे (वय ५७) व कृष्णा दादू सोनवणे (वय ५३, तिघेही रा. भीमनगर, दौंड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार संजय कोठावळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही अड्ड्यांवरून एकूण २ हजार ३५० रूपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com