यवत येथे लोकशाही दिनाचे आयोजन

यवत येथे लोकशाही दिनाचे आयोजन

Published on

दौंड, ता. १२ : यवत (ता. दौंड) येथे सोमवारी (ता. १७) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली. लोकशाही दिन व जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त येथील पालखी तळ मैदानावर तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थिती राहणार आहेत.
ग्रामस्थांच्या शासनाच्या विविध विभागांसंबंधी असलेल्या अडीअडचणी यावेळी सोडविल्या जाणार आहेत. तसेच डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर अंतर्गत अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी आयडी तयार करून देणे, शिधापत्रिका विषयक ई- केवायसी करणे, विशेष अर्थसाह्य योजनांबाबत ई- केवायसी करणे, आयुष्यमान भारत योजनेकरिता नोंदणी करणे आदी सुविधा देखील ग्रामस्थांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या लोकशाही दिनात सहभागी होऊन आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com