दौंडमधील मटका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
दौंड, ता. १२ : दौंड शहरातील मटका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी माहिती दिली की, मंगळवारी (ता. ११) दुपारी महात्मा गांधी चौकातील भाजी मंडई रस्त्यावरील ‘श्रीकृष्ण कॅाम्पलेक्स’मध्ये मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी मटका जुगारासाठी आकडे घेणारे सागर संजय पलंगे (रा. श्रीकृष्ण कॅाम्पलेक्स, दौंड) व अशोक राधन सोनवणे (रा. भीमनगर, दौंड) या दोघांकडून रोख २ हजार ३०५ रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी हवालदार नितीन बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सागर पलंगे याच्याविरुद्ध यापूर्वी देखील जुगारप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. शहरातील श्री चतु:श्रृंगी माता मंदिराच्या मागे देखील मटका जुगार राजरोसपणे खेळला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

