मृत अर्भक, मातेची होणार डीएनए चाचणी

मृत अर्भक, मातेची होणार डीएनए चाचणी
Published on

दौंड, ता. २७ : गोपाळवाडी (ता. दौंड) येथे उकिरड्यावर एका प्लास्टिक बरणीमध्ये आढळलेले मृत अर्भक आणि अर्भकाच्या मातेची डीऑक्सिरिबो न्यूक्लिक ॲसिड (डीएनए) ही आनुवंशिक चाचणी केली जाणार आहे. तर दुसऱ्या बरणीमध्ये सापडलेल्या मानवी अवयवांची दौंड उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय पथक तपासणी करणार असल्याची माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी आज (ता. २७) दिली.
दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत मंगळवारी (ता. २५) सकाळी जिजामाता नगर येथील उकिरड्यावर एका प्लास्टिक बरणीमध्ये एक अर्भक आणि दुसऱ्या बरणीमध्ये मानवी अवयव आढळून आले होते. दौंड शहरातील भंगाळे क्लिनिक अॅण्ड नर्सिंग होम या रूग्णालयातील हे अर्भक आणि मानवी अवयव असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
पवार म्हणाले, ‘‘रुग्णालयाने केलेल्या दाव्यानुसार संबंधित महिलेची ३० ऑगस्ट २०२० मध्ये प्रसूती झाली. मृत अर्भक हे मुदतपूर्व (प्रीमॅच्युअर) जन्माला आल्याचा रूग्णालयाचा दावा आहे. डीएनए चाचणी अहवाल आणि तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अर्भकाचे विहित पद्धतीने अंत्यसंस्कार न करता साडेचार वर्षे रूग्णालयात ठेवण्यामागील कारण आणि त्यानंतर अर्भक थेट उकिरड्यावर फेकण्यामागील उद्देश तसेच दुसऱ्या बरणीतील अवयव रुग्णालयाबाहेर टाकण्याचे करण शोधले जात आहे. रुग्णालयाने पोलिस ठाण्यात सादर केलेले अभिलेख आणि नोंदींची देखील पडताळणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशी करिता एक समिती नियुक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com