

दौंड, ता. २६ : दौंड मुख्य बाजारात ज्वारीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची एकूण १५१ क्विंटल आवक असून त्यास प्रतवारीनुसार किमान २१०० तर कमाल ४४०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहेत. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची एकूण ४५३० क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ४०० रुपये ; तर कमाल १४०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला.
कोथिंबिरीची १०५२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ९०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ३५४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० तर कमाल १८०० जुडी असा बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ७७२ २२०० ३१००
ज्वारी १५१ २१०० ४४००
बाजरी ११५ २००० ३४००
हरभरा १०५ ५००० ५६५०
मका ०३० २००० २२००
तूर ०२५ ६००० ६४५१
भाजीपाला व फळांचा बाजारभाव (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२१०, आले-३००, गाजर-३००, काकडी- २७०, भोपळा-१००, कोबी-८०, फ्लॅावर - ३००, टोमॅटो - १५०, हिरवी मिरची-६००, लिंबू - १४००, बिट - १००, कलिंगड - ११५, खरबूज - १३०.
शिमला मिरची, बटाट्याच्या भावात वाढ
दौंड मुख्य बाजारात शिमला मिरचीची १८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३५० तर कमाल ४७० रुपये सा दर मिळाला. बटाट्याची २६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा १० किलोसाठी किमान २०० तर कमाल २१० रुपये असा बाजारभाव मिळाला. काकडीची ८७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २७० रुपये असा दर मिळाला.
भोपळा, हिरवी मिरची व खरबुजाच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात भोपळ्याची ३९ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०३० तर कमाल १०० रुपये,असा बाजारभाव मिळाला. खरबुजाची १४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०४० तर कमाल १३० रूपये, असा दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.