दौंडला खासगी रुग्णालयात 
कर्मचाऱ्याची आत्महत्या

दौंडला खासगी रुग्णालयात कर्मचाऱ्याची आत्महत्या

Published on

दौंड, ता. २७ : दौंड शहरातील एका खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रुग्णालयातच आत्महत्या केली. अभिषेक गोविंद पहाडे (वय २४, रा. निमगाव खलू, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, अभिषेक गोविंद पहाडे (वय २४, रा. निमगाव खलू, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. दौंड शहरातील अहिल्यादेवी होळकर सहकार चौक ते रेल्वे पाणी टाकी रस्त्यावरील पाटील हॅास्पिटल येथे अभिषेक पहाडे हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात परिचर म्हणून काम पाहत होता. सोमवारी (ता. २६) रात्री दहा वाजता त्याने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत दौंड पोलिस ठाण्यात ओमकार गोविंद पहाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती हवालदार ए. डी. सय्यद यांनी दिली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. हवालदार बापू रोटे या प्रकरणी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com