दौंड तालुक्यात ज्वारी ३६५० रुपये क्विंटल

दौंड तालुक्यात ज्वारी ३६५० रुपये क्विंटल

Published on

दौंड, ता. ३० : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक घटली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४५० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची एकूण ९१ क्विंटल आवक असून त्यास प्रतवारीनुसार किमान २१५० रुपये; तर कमाल ३६५० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची १३१ क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रतवारीनुसार किमान २००० रुपये; तर कमाल ३२०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. तालुक्यात आठवडाभर सलग पाऊस पडत असल्याने त्याचा थेट परिणाम शेतमालाच्या आवकेवर झाला आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभावात तेजी आहे. केडगाव उपबाजारात चवळीची सहा क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल किमान ९८००; तर कमाल १३००० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू) कमाल (रू)
गहू २८७ २४०० ३१५०
ज्वारी ०९१ २१५० ३६५०
बाजरी ०६० २३५० ३२००
हरभरा ०३० ५००० ५५००
मका ०६७ १८४० २२००
मूग ०२८ ७५०० ८३५०
तूर ०२२ ५५०० ६४१०


भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) :
बटाटा - २००, आले - ३०० , गाजर - २५०, कैरी - १५०, काकडी - ३००, भोपळा - १५०, कोबी - १५०, फ्लॅावर - ३००, टोमॅटो - ४५०, हिरवी मिरची - ५००, भेंडी - ५००, कारली - ५००, दोडका - ५००, वांगी - ४००, शिमला मिरची - ५५०, गवार - ८००, लिंबू - ५००.

कोथिंबीर, मेथी व शेपूच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १३०७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल ३५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ९७५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल २००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपूची ६१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ६०० रुपये, तर कमाल १६०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

कांद्याच्या दरात वाढ
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून प्रतिक्विंटल ६०० रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याची एकूण ४०४५ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल २००० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची एकूण ७७८५ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल १४०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com