इन्स्टिट्यूट द्विवार्षिक निवडणुकीत 
मजदूर युनियनचे दुहेरी वर्चस्व

इन्स्टिट्यूट द्विवार्षिक निवडणुकीत मजदूर युनियनचे दुहेरी वर्चस्व

Published on

दौंड, ता. ४ : शहरातील मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट व सिनिअर इन्स्टिट्यूटच्या द्विवार्षिक निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन प्रणीत पॅनेलने सर्व १८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. सिनिअर इन्स्टिट्यूटच्या सचिवपदी अमित अमोलिक, तर ज्युनिअर इन्स्टिट्यूटच्या सचिवपदी साईराज माळी निवडून आले आहेत.
मध्य रेल्वेच्या दौंड जंक्शन येथील ज्युनिअर व सिनिअर इन्स्टिट्यूटच्या स्वतंत्रपणे पार पडलेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व सेंट्रल रेल्वे मजदूर संघ प्रणीत पॅनेलमध्ये प्रामुख्याने मुख्य लढत झाली. दोन्ही इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापन आणि देखभालीसाठी प्रत्येकी १ सचिव, १ खजिनदार व ७ कार्यकारिणी सदस्य निवडले जातात. सिनिअर इन्स्टिट्यूटचे ५०९, तर ज्युनिअर इन्स्टिट्यूटचे ६७१ मतदार आहेत. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पुणे विभागाचे अध्यक्ष संदीप शेलार व ऑल इंडिया एससी- एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. दोन्ही इन्स्टिट्यूटच्या एकूण १८ जागांवर पॅनेलचे उमेदवार विजयी झाले.
सिनिअर इन्स्टिट्यूटच्या खजिनदारपदी महेश उबाळे यांची, तर कार्यकारिणी सदस्यपदी गौरव ढवळे, अखिलेश सिंग, बलराम दास, ज्योतिष कुमार सिंग, सचिन जंजिरे, अनिल शिंदे, नवनाथ दुधे निवडून आले. तसेच ज्युनिअर इन्स्टिट्यूटच्या खजिनदारपदी धनराज मीना यांची, तर कार्यकारिणी सदस्यपदी अंगद कुमार चौधरी, मुकेश कुमार, संजय रमेश सोनवणे, विमल कुमार सिंग, सतीशकुमार राठोड, नागेश वाघमारे, विनोद कुमार वर्मा निवडून आले आहेत.

दौंड रेल्वे स्थानकाजवळ ब्रिटिश काळात रेल्वे चालक व अधिकाऱ्यांना क्रीडा व मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीनियर रेल्वे इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. या इन्स्टिट्यूटच्या आवारात सभागृह, बॅडमिंटन सभागृह, टेनिस कोर्ट, वाचनालय, सण- समारंभासाठी मोकळी जागा आदी सुविधा उपलब्ध आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूटमध्ये वाचनालय, लग्नकार्य किंवा विविध कार्यक्रमांसाठी गणेश सभागृह, बिलियर्ड्स सभागृह, क्रांती मैदान, व्हॅालीबॉल मैदान, योगा कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दौंडमधील नागरिक या सुविधांचा लाभ घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com