चिंचोलीतील अत्याचारप्रकरणी दोघांना बेड्या

चिंचोलीतील अत्याचारप्रकरणी दोघांना बेड्या

Published on

दौंड , ता. ५ : स्वामी चिंचोलीत (ता. दौंड) आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे चारचाकी वाहनातून निघालेल्या भजनी मंडळातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर सहा दिवसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. दौंड पोलिस ठाण्यात पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांनी शनिवारी (ता. ५) पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. स्वामी चिंचोली येथे घडलेल्या गुन्ह्यासंबंधी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का?, याचा तपास अजूनही सुरू आहे. याबाबत पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीपसिंग गिल उद्या (ता. ६) विस्तृत माहिती देतील, असे रमेश चोपडे यांनी सांगितले. दोन संशयित आरोपींना अटक केलेली असली तरी पोलिसांनी त्या दोघांचे नाव, वय व इतर माहिती तपासाच्या गोपनीयतेसाठी सार्वजनिक केलेली नाहीत.
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली येथे ३० जून रोजी पहाटे हा प्रकार घडला होता. आषाढी वारीसाठी निघालेल्या या कुटुंबातील तीन महिलांना दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दीड लाख रुपये किमतीचे दागिने काढून घेतले होते. तर एका अल्पवयीन मुलीवर शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com