दौंडमध्ये ४१ सरपंचपद महिलांसाठी राखीव

दौंडमध्ये ४१ सरपंचपद महिलांसाठी राखीव

Published on

दौंड, ता. ७ : दौंड तालुक्यात सरपंचपदाच्या आरक्षणाची फेरसोडत काढण्यात आल्यानंतर ८० पैकी ४१ ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत, अशी माहिती दौंड तालुक्याचे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.
दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सोमवारी (ता. ७) ही फेरसोडत काढण्यात आली. सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक पद वाढल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील एक जागा कमी झाल्याने फेरसोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात २७ फेब्रुवारी रोजी दौंड तालुक्यातील जिरेगाव, रोटी, राहू, एकेरीवाडी, टेळेवाडी, देलवडी, नाथाचीवाडी, देऊळगाव राजे, पिलाणवाडी व वासुंदे या दहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली होती. त्यामुळे उर्वरित ७० सरपंचपदाच्या आरक्षणसाठी फेरसोडत काढून ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले.
सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी दौंड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण २२, सर्वसाधारण महिला २३, इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) ११, इतर मागासवर्गीय महिला ११, अनुसूचित जाती ५, अनुसूचित जाती महिला ६, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती महिला १, याप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले.

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण- देलवडी, नाथाचीवाडी, देऊळगाव राजे, पिलाणवाडी, पांढरेवाडी, खुटबाव, खोपोडी, गार, ताम्हाणवाडी, नंदादेवी, पाटस, बिरोबावाडी, बोरीभडक, रावणगाव, लोणारवाडी, वडगाव दरेकर, वरवंड, कुसेगाव, कोरेगाव भिवर, वाखारी, वाटलूज, सहजपूर.
सर्वसाधारण महिला- वासुंदे, आलेगाव, उंडवडी, कडेठाण, खामगाव, गिरीम, टाकळी, दापोडी, देऊळगाव गाडा, नांदूर, नानवीज, पेडगाव, भांडगाव, यवत, लिंगाळी, सोनवडी, हातवळण, नायगाव, मळद, कानगाव, शिरापूर, गोपाळवाडी, नानगाव.
इतर मागासवर्गीय- एकेरीवाडी, टेळेवाडी, खोर, केडगाव, दहिटणे, पडवी, पाटेठाण, स्वामी चिंचोली, कासुर्डी, कौठडी, पिंपळगाव.
इतर मागासवर्गीय महिला- रोटी, राहू, बोरीऐंदी, कुरकुंभ, खोरवडी, राजेगाव, बोरीपार्धी, पारगाव, डाळिंब, गलांडवाडी, मिरवडी.
अनुसूचित जाती- भरतगाव, देवकरवाडी, पानवली, मलठण, हिंगणीगाडा.
अनुसूचित जाती महिला- बोरीबेल, वाळकी, वडगाव बांडे, खडकी, लडकतवाडी.
अनुसूचित जमाती- खानवटे.
अनुसूचित जमाती महिला- हिंगणीबेर्डी.

७५ दिवसांत तिसरी सोडत
दौंड तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात सोडतीद्वारे काढले होते. त्यामुळे उर्वरित सत्तर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी दौंड येथे काढण्यात आली होती. परंतु त्यामध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याने २५ एप्रिल रोजी फेरसोडत काढण्यात आली. त्यानंतर फेरसोडत काढून ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com