दौंडच्या मुख्य बाजारामध्ये हरभऱ्याची आवक वाढली
दौंड, ता. २३ : दौंड तालुक्यात हरभऱ्याची आवक वाढली आहे. बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४८९ रुपयांची वाढ झाली. हरभऱ्याची ४६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार किमान ४५०० तर कमाल ६००० प्रतिक्विंटल,असा बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १२४५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०० व कमाल ४०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ७१४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ४०० तर कमाल ११०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपुची ४२१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू ५९२ २२०० ३०५०
ज्वारी १११ १७०० ३३५०
बाजरी २७४ १७०० ३२००
हरभरा ०४६ ४५०० ६०००
मूग ००६ ६१०० ७५००
मका ०१७ २००० २४१०
तूर ०११ ५२०० ५७००
चवळी ००५ ५५०० ५७००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल बाजारभाव) : बटाटा-२००, आले-३००, गाजर-३००, पेरू-३००, काकडी-२००, भोपळा-२००, कोबी-२००, फ्लॅावर-३००, टोमॅटो-३००, हिरवी मिरची-८००, भेंडी-४५०, कार्ली-४५० दोडका-३७०, वांगी-६००, शिमला मिरची-६००, वाटाणा-९००, डाळिंब-७००.
कांद्याच्या दरात घट
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून एकूण ४८४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल १८०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.