ज्वारी चार हजार रुपये क्विंटल

ज्वारी चार हजार रुपये क्विंटल

Published on

दौंड , ता. २६ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक वाढली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ७४९ रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची एकूण १२६ क्विंटल आवक असून त्यास प्रतवारीनुसार किमान २२०० तर कमाल चार हजार प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची ७५ क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रतवारीनुसार किमान २१०० रुपये ; तर कमाल ३२५१ रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.

दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १२४३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ४४२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० रुपये , तर कमाल १४०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूची १८३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून एकूण ११०२० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० रुपये ; तर कमाल १८०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला.


शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रुपये) कमाल (रुपये)
गहू ४९५ २३०० ३०००
ज्वारी १२६ २२०० ४०००
बाजरी ५०० २००० ३१००
हरभरा ०२८ ४८०० ६१००
मका ०२१ २००० २५००
उडीद ०१० ५००० ६७२०
तूर ०११ ५००० ५५६०
मूग ४९० ६५०० ९०००
-----

दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति १० किलोसाठीच कमाल दर) : बटाटा : १८०, आले : ३५०, गाजर : ३००, पेरू : १५०, काकडी : १३०, भोपळा : १००, कोबी : ५०, फ्लॅावर : ३००, टोमॅटो : ३००, हिरवी मिरची : ५००, भेंडी : ३५०, कारली : २५०, दोडका : ३००, वांगी : २५०, शिमला मिरची : ३००, गवार : १३००, घेवडा : ३००, बिट : २००, वाटाणा : ८००, डाळिंब : ६००, मका कणीस : १६०, लिंबू : ५००.

बटाटा, टोमॅटो व कोबीच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात बटाट्याची २६७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १५० तर कमाल १८० रुपये, असा दर मिळाला. टोमॅटोची २६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ३०० रुपये, असा दर मिळाला. कोबीची ७२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३० तर कमाल ५० रुपये, असा दर मिळाला.

केडगाव येथे डाळिंबाच्या दरात वाढ

केडगाव उपबाजारात डाळिंबाची ६१३ क्रेट आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १३० रुपये, असा भाव मिळाला. मागील आठवड्यात डाळिंबाची ५६१ क्रेट आवक झाली होती व त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो १५ ते ११० रुपये, असा भाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com