दौंड तालुक्यात डाळिंबाची ६१३ क्रेट आवक
दौंड , ता. ३ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. असे असले तरी बाजारभाव स्थिर आहे. डाळिंबाची ६१३ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १३० रुपये असा भाव मिळाला.
गणेशोत्सवामुळे दौंड तालुक्यात पालेभाज्यांना व फळांना चांगली मागणी आहे. गौरी आगमनामुळे शेपूला मोठी मागणी होती. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून एकूण ८८३० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० तर कमाल १८०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. केडगाव उपबाजारात पेरूची ५८३ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो १३ ते १७ रुपये असा भाव मिळाला. दौंड मुख्य बाजारात मेथीची ५४५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० तर कमाल १२०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची २०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ४०० व कमाल ९०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ५४३ २३०० ३००१
ज्वारी १८१ २१६० ४०००
बाजरी ३२४ १९०० २८१०
हरभरा ०५७ ४५५० ६१००
मका ०३० २००० २५००
उडीद ०३१ ५५०० ६२००
मूग १३० ६१०० ८४००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे ( प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर ) : बटाटा-१८०, आले-३५०, गाजर-३००, पेरू-१५०, काकडी - १५०, भोपळा - १३०, कोबी-५०, फ्लॅावर-२५०, टोमॅटो-३००, हिरवी मिरची-५५०, भेंडी-३००, कार्ली - ३००, दोडका - ४००, वांगी-४००, शिमला मिरची-३५०, गवार-६५०, घेवडा-५००, बिट-१५०, वाटाणा-८००, डाळिंब - ६००.
टोमॅटो, भेंडी व गवारीच्या बाजारभावात घट
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची २३५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २०० रुपये असा दर मिळाला. भेंडीची ३८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ३०० रुपये असा दर मिळाला. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन त्यासप्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ६५० रुपये असा बाजारभाव मिळाला.
गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेपूला मोठी मागणी होती. दौंड मुख्य बाजारात शेपुची १०८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ७०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. तर कोथिंबिरीची ११६५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० व कमाल ९०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.