तीन लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त

तीन लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त

Published on

दौंड, ता. २० : नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दौंड व इंदापूर तालुक्यात केलेल्या कारवाईत तीन लाख रुपये मूल्य असलेला बनावट मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन तरुणांना अटक केली आहे.
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे पुणे- सोलापूर महामार्गावर सोमवारी (ता. १७) रात्री ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महामार्गावरून संशयास्पदरीत्या जाणाऱ्या मारुती इको मॅाडेल वाहनाची थांबवून तपासणी केली. त्यामध्ये गोवा येथे निर्मित आणि राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्याचे बॅाक्स आढळून आले. पथकाने वाहनचालक वैभव रवींद्र साळुंके (वय २७, रा. भवानीनगर, ता. इंदापूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशी दरम्यान, मद्याचा साठा हा भवानीनगर येथून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने मंगळवारी (ता. १८) किरण साळुंके याच्या भवानीनगर (ता. इंदापूर) येथील घरावर धाड टाकली. या धाडीत घरात लपविण्यात आलेला मद्याचा साठा आढळून आला. त्याचबरोबर नामांकित मद्य कंपन्यांचे तब्बल १३०० बनावट लेबल आढळून आले. पथकाने किरण रवींद्र साळुंके (वय ३३) आणि संदीप राजाराम रणदिवे (वय २८) यांना ताब्यात घेत अटक केली आहे.
कारवाईत बनावट मद्याच्या ११५२ बाटल्या आणि एक वाहन जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, अंमलदार संकेत वाजे, सौरभ देवकर, सोपान टोणपे, केशव वामने यांनी ही कारवाई केली.

अवैध मद्यासंबंधी माहिती देण्याचे आवाहन
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, साठा व विक्री संबंधी नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी तत्काळ टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ९९९९ किंवा ०२०२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

04222

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com