दौंडमध्ये पकडली ४० मोकाट जनावरे
दौंड, ता. २४ : दौंड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानास आठ दिवस उरले असताना ४० मोकाट जनावरे पकडली आहेत. त्याचबरोबर शहराच्या काही भागांची स्वच्छता केली जात आहे.
ठेकेदाराच्या साह्याने आतापर्यंत ४० जनावरे पकडून त्यांची गोशाळेत रवानगी केली असल्याची माहिती नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी शाहू पाटील यांना सोमवारी (ता. २४) सांगितले. दौंड शहरात मागील पाच दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज चौक, दौंड-गोपाळवाडी रस्त्याजवळील वरदविनायक सोसायटी परिसर आणि अन्य भागांमध्ये रात्री नगरपालिकेच्या वतीने मोकाट जनावरे पकडली आली आहेत. नगरपालिकेने जनावरे पकडण्याचा ठेका दिला असून, संबंधित माणसे रात्रीच गुरे पकडत आहेत. ती टेम्पोत भरून एका गोशाळेत जमा केली जात आहेत. जनावरे पकडण्याची मोहिम दिवसारा बविण्याऐवजी रात्री राबविली जात असल्याने परिसरातील नागरिकांनी त्याबाबत संबंधितांना विचारले असता त्यांनी दिवसा मोहीम राबविल्यास जनावरे उधळून नागरिक जखमी होण्याची शक्यता व्यक्त केली.
दौंड नगरपालिकेच्या या मोहिमेचे स्वागत होत असले तरी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील आठ वर्षात शहरभर जनावरांचा उपद्रव वाढून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी मोहीम न राबविता मतदानाच्या आधीच सुरू केली आहे. दरम्यान, मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मागणी होत आहे.
मतदान आधी स्वच्छता मोहीम
दौंड नगरपालिकेचे आणि खासगी कंत्राटी एजन्सीचे कर्मचारी महिनोमहिने रस्ते झाडत नाही किंवा साठलेला कचरा देखील उचलत नाही. मात्र, मतदानाचे दिवस जवळ आल्यानंतर अंतर्गत रस्ते झाडण्यासह रस्त्यालगतची झुडपे आणि काटेरी वनस्पती देखील काढली जात आहे. ज्या भागांमध्ये घंटागाड्या जात नव्हत्या तेथे घंटागाड्या दिसू लागल्या आहेत. पण वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने ठिकठिकाणी कचरा गोळा करण्यापेक्षा पेटवून देण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

