रेल्वे प्रवासात 
तीन लाखांची चोरी

रेल्वे प्रवासात तीन लाखांची चोरी

Published on

दौंड, ता. २७ : दादर- पंढरपूर सातारा एक्सप्रेस व काझीपेट- हडपसर एक्सप्रेसमध्ये मंगळवारी (ता. २५) चोरी झाली. त्यामध्ये तीन लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
अक्षय बंडू लेंडवे ( वय २७ , रा. बदलापूर पूर्व, ठाणे) हे एक्सप्रेसने कुटुंबीयांसह आरक्षित डब्यातून दादर सेंट्रल ते पंढरपूर असा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान दौंड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर त्यांच्या आईस आसनाजवळ अडकवलेली पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. पर्समधील सोन्याचे गंठण, एक मोबाईल संच, रोख रक्कम, औषधे, असा एकूण एक लाख ६१ हजार ३२८ रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याबाबत लेंडवे यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
दुसरी चोरी काझीपेट- हडपसर एक्सप्रेसमध्ये झाली. सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे साईकुमार दुर्गादास मन्नपू (वय ३६, रा. पुनावळे, पुणे) हे तेलंगण राज्यातील सिकंदराबाद ते हडपसर, असा साधारण डब्यातून प्रवास करीत होते. रात्री जेवणानंतर त्यांनी त्यांचा दोन लाख रुपये किंमत असलेला डेल कंपनीचा एक लॅपटॅाप बॅगमध्ये ठेवून ती बॅग आसनाखाली ठेवली. मंगळवारी (ता. २५) सकाळी दौंड रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस येण्यापूर्वी त्यांना त्यांची बॅग चोरीस गेल्याचे आढळून आले. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर चोरीचा गुन्हा तपासाकरिता दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com