दौंडला मंदिर, मशीद, चर्चमध्ये प्रचार
दौंड, ता. २८ : दौंड नगरपालिका निवडणुकीत पारंपरिक प्रचारासह हायटेक प्रचारयंत्रणा राबविली असली, तरी उमेदवारांनी मतदारांच्या थेट भेटीवर अधिक भर दिला आहे. गुरूवारी श्री दत्तात्रेय यांचा दिवस असल्याने शहर व परिसरातील श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आरती करून उमेदवारांनी मतदानाचे आवाहन केले. शुक्रवारच्या दुपारच्या नमाजपठणाला अधिक गर्दी असल्याने उमेदवारांनी प्रमुख मशिदींबाहेर उभे राहून मतदानाचे आवाहन केले. मागील रविवारी सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा (संडे मास) असल्याने उमेदवारांनी चर्चमध्ये जाऊन मतदानाचे आवाहन केले होते. येत्या रविवारी (ता. ३०) देखील उर्वरित चर्चमध्ये जाण्याचा उमेदवारांचा मानस आहे. तर, दौंड- पुणे- दौंड असा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या मतदारांना भेटण्यासाठी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटणाऱ्या पुणे शटलमध्ये जाऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले.
दौंड शहरात तीनचाकी रिक्षांवर भोंगे बांधून प्रचार सुरू आहे. या रिक्षा दर ४० ते ४५ मिनिटाला प्रभागात घिरट्या घालून प्रचार करीत आहे. त्यांच्या कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना कंटाळा आला आहे. छोट्या टेम्पोवर एलईडी स्क्रीन बसवून त्याद्वारे उमेदवारांचा परिचय, काही मतदारांचे अनुभव कथन, आदींद्वारे प्रचार सुरू आहे. परिचयपत्र, स्टीकर व माहितीपत्राद्वारे देखील प्रचार सुरू आहे.
तळमजल्यावर कोपरा सभा
नगराध्यक्षपदाचे काही उमेदवार सकाळपासूनच घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. अपार्टमेंटच्या तळमजल्यावर कोपरा सभा घेतल्या जात आहेत. घरोघरी जाऊन मतदारांशी हस्तांदोलन करणे, वयस्कर मतदारांचे पाया पडणे, शुभेच्छापर साखर किंवा गुळाचा खडा स्वीकारणे, मोबाइलमध्ये फोटो घेणे, प्रत्येकाची समस्या किंवा अपेक्षा ऐकून घेणे, आदी प्रक्रियेत उमेदवारांची दमछाक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

