दौंडमध्ये २५ जागांसाठी मतदान

दौंडमध्ये २५ जागांसाठी मतदान

Published on

दौंड, ता. १ : दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील ५४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण १३ प्रभागांमधून २६ सदस्य निवडले जाणार होते, परंतु प्रभाग क्रमांक ९ - अ मधील एका जागेची निवडणूक स्थगित करण्यात आल्याने सदस्यपदाच्या २५ जागांसाठी मतदान होणार आहे.
दौंड नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण यांनी या बाबत माहिती दिली. निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १) दुपारी शासकीय धान्य गोदाम येथून पोलिस बंदोबस्तात मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मतदान यंत्रे आणि साहित्य वितरित करण्यात आले. दौंड नगरपालिका ही ‘ब’ वर्ग नगरपालिका असून नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला) करिता राखीव असून जनतेतून थेट निवड होणार आहे. निवडणूक तयारी म्हणून मतदान अधिकारी व कर्मचारी यांना तीन टप्प्यात अनुक्रमे १६ व २२ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असलेली दोन फिरते तपासणी पथके (फ्लाइंग स्क्वाड टीम ) कार्यरत आहेत. त्याचबरोबर वाहने, बेहिशोबी रोकड, सोने किंवा किमती धातू आदींची तपासणी करण्यासाठी प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असलेली ४ स्थिर सर्वेक्षण पथके ( स्टॅटिक सर्वेलन्स टीम) कार्यरत आहेत. मतदान आणि मतमोजणी दरम्यान व्हिडिओ चित्रीकरणासाठी प्रत्येकी चार जणांचा समावेश असलेली दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सोशल मिडियावर नजर ठेवण्यासाठी दोन सदस्यांचे एक पथक सक्रिय आहे.
दौंड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने समस्यांच्या निराकरणासाठी निवडणूक प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला ७५२२९९८४५० हा मदत मोबाइल क्रमांक सक्रिय आहे. त्याशिवाय मदत केंद्रात ३ सदस्य कार्यरत आहेत. मतमोजणी बुधवारी (ता. ३) दौंड - अहिल्यानगर महामार्गावरील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे.


एक नगराध्यक्षपद : ६ उमेदवार
नगरसेवक २५ जागा : ८३ उमेदवार

मतदारसंख्या
पुरुष : २५३४१
स्त्री : २५१४६
तृतीयपंथी : ०१
एकूण : ५०४९०

सुरक्षा यंत्रणा
१ पोलिस उप अधीक्षक, ३ निरीक्षक, ८ उप निरीक्षक, १ राज्य राखीव पोलिस दलाचे स्ट्रायकिंग फोर्स, १ पुणे ग्रामीण पोलिस दलाचे दंगल नियंत्रण पथक, १०० पोलिस अंमलदार, ३३ गृहरक्षक दल जवान.

मतदान अधिकारी / कर्मचारी : ३३०
राखीव : २२
उमेदवार खर्च तपासणीकरिता ३ अधिकाऱ्यांचे दक्षता पथक कार्यान्वित

ईव्हीएम (राखीव) :
कंट्रोल युनिट : ६८ (१३)
बॅलेट युनिट : १२३ (२४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com