‘नागरकोविल एक्सप्रेस’मध्ये प्रवाशाच्या मोबाईलची चोरी
दौंड, ता. १० : मुंबई- नागरकोविल एक्सप्रेसमधील एका प्रवाशाचा मोबाइल संच चोरीस गेला. आरक्षित डब्यात ही चोरी झाली आहे.
सूरज बलराज गंजी (वय २९, रा. तळोजा, नवी मुंबई) हे ५ डिसेंबर रोजी नागरकोविल एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- यादगीर (कर्नाटक), असा प्रवास करीत होते. प्रवासाच्या दरम्यान दौंड रेल्वे स्थानकावरून एक्सप्रेसने प्रस्थान केल्यानंतर त्यांना त्यांचा उशीखाली ठेवलेला मोबाइल संच चोरीस गेल्याचे लक्षात आले. या मोबाइल संचाचे मूल्य पंचावन्न हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत सूरज गंजी यांनी धावत्या एक्सप्रेसमध्ये चल तिकीट परीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देण्यासह रेल्वे हेल्पलाइनच्या १३९ या क्रमांकावर कॉल केल्यानंतर दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा तपासाकरिता वर्ग केला. या प्रकरणी सोमवारी (ता. ८) अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

