दौंड तालुक्यात तुरीची १९७ क्विंटल आवक

दौंड तालुक्यात तुरीची १९७ क्विंटल आवक

Published on

दौंड, ता. ३१: दौंड तालुक्यात तुरीची आवक वाढली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १५० रुपयांची वाढ झाली आहे. तुरीची १९७ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान ५ हजार ९०० तर कमाल ६ हजार ७५० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात तुरीची १७२ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ५ हजार ५०० तर कमाल ६ हजार ६०० रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ११ हजार ६१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये असा बाजारभाव मिळाला. मेथीची ९ हजार ४४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ६०० रुपये असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची १०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.


तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ३७७ २३०० ३२६०
ज्वारी १४८ १८५१ ४१५०
बाजरी ३४१ १७०० ३३००
उडीद ०३६ ४००० ५१००
मूग ००६ ५००० ८२५०
हरभरा ०२१ ४८५० ५३००
तूर १९७ ५९०० ६७५०
मका २०९ १५०० २०००
-----

दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळभाज्यांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा - १५०, आले - ५१० , गाजर - ३००, पेरू - १५०, काकडी - २५०, भोपळा - १५०, कोबी -१५०, फ्लॅावर - १५०, टोमॅटो - ४००, हिरवी मिरची - ५५०, भेंडी - ७५०, कारली - ६००, दोडका - ६५०, वांगी - २००, शिमला मिरची - ५००, वाटाणा - ४००, गवार - १६०० , घेवडा - २००, बीट - १५०, लिंबू - ३५०.
-----
गाजर, भेंडी व दोडक्याच्या भावांत वाढ
दौंड मुख्य बाजारात गाजराची २८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ३०० रुपये असा भाव मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३०० तर कमाल ७५० रुपये असा भाव मिळाला. दोडक्याची १० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ६५० रुपये, असा भाव मिळाला.
-----
केडगावमध्ये कांदा २६०० रुपये क्विंटल
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून बाजारभावात मात्र प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल शंभर रुपयांची घट झाली आहे. कांद्याची ९ हजार २६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०३०० रुपये ; तर कमाल २ हजार ६०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ७ हजार ९६६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०२०० रुपये ; तर कमाल २ हजार ७०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com