दौंड बाजारात ज्वारी ४६०० रुपये क्विंटल
दौंड, ता. ८ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४५० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची १२१ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान १९००, तर कमाल ४६०० रुपये क्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात ज्वारीची १४८ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १८५१, तर कमाल ४१५० रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १३ हजार २३३ जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान २००, तर कमाल ५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीच्या ९ हजार ८१५ जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान २००, तर कमाल ६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूच्या ४५० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान ३००, तर कमाल ७०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीच्या १३० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा कमाल ५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ४६० २३५० ३२००
ज्वारी १२१ १९०० ४६००
बाजरी ३०३ १९०० ३३००
उडीद ०१० ४१०० ५३५०
हरभरा ०१९ ४७०० ५३५०
तूर ३१७ ६१०० ७०००
मका ११५ १६०० २०००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति १० किलोसाठीचे कमाल दर) :
बटाटा १५०, आले ५५०, गाजर २५०, पेरू १५०, काकडी ३००, भोपळा १५०, कोबी १५०, फ्लॅावर १५०, टोमॅटो ३५०, हिरवी मिरची ८००, भेंडी ७००, कार्ली ५००, दोडका ६३०, वांगी १००, शिमला मिरची ५००, वटाणा ३५०, गवार १२००, घेवडा १५०, बिट १५०, मका कणीस १५०, लिंबू ३५० रुपये.
केडगावमध्ये कांदा २२०० रुपये क्विंटल
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून, बाजारभावात मात्र प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४०० रुपयांची घट झाली आहे. कांद्याची १४ हजार २५७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये, तर कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ९२६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये, तर कमाल २६०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

