दौंडमधील बाजारात बाजरी ३२५० रुपये क्विंटल

दौंडमधील बाजारात बाजरी ३२५० रुपये क्विंटल

Published on

दौंड, ता. १६ : दौंड तालुक्यात बाजरीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ५० रुपयांची घट झाली आहे. बाजरीची २३९ क्विंटल आवक झाली असून, त्यास क्विंटलला किमान १७०० रुपये, तर कमाल ३२५० रुपये क्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात बाजरीची ३०३ क्विंटल आवक होऊन त्यास क्विंटलला किमान १९०० रुपये; तर कमाल ३३०० रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून, बाजारभाव स्थिर आहे. पाटस उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दौंड मुख्य बाजारात हरभऱ्याची १२ हजार ३२५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ४०० रुये; तर कमाल १२०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीची १४ हजार ५९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये; तर कमाल ६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ९८१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूची २५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदा पातीची २२५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.

तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ४१२ २००० ३१२५
ज्वारी ०५२ १९०० ४४५०
बाजरी २३९ १७०० ३२५०
उडीद ०२९ ४५०० ५११०
हरभरा ००९ ४२०० ५२५०
तूर १८६ ५६०० ७०००
मका १२६ १६५० १९००


दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा- १४०, आले- ४००, गाजर- ३००, पेरू- १५०, काकडी- ३५०, भोपळा- २००, कोबी- १५०, फ्लॅावर- ४००, टोमॅटो- ३००, हिरवी मिरची- ८००, भेंडी- ७००, कार्ली- ६००, दोडका- ७००, वांगी- ३००, शिमला मिरची- ५००, वटाणा- ३५०, गवार- ११००, घेवडा- २००, बिट- २५०, डाळिंब- १०२०, लिंबू- ३००.

बटाटा व टोमॅटोच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात बटाट्याची २१३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी कमाल १४० रुपये, असा दर मिळाला. टोमॅटोची २०१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० रुपये; तर कमाल ३०० रुपये, असा दर मिळाला. मकर संक्रांतीमुळे मागणी वाढल्याने गाजर, वांगी, ओला हरभरा, आदींच्या दरात वाढ झाली होती.

केडगावमध्ये कांदा १८०० रुपये क्विंटल
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून, बाजारभावात मात्र प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल चारशे रुपयांची घट झाली आहे. कांद्याची १०५७१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये; तर कमाल १८०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची १४२५७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०३०० रुपये; तर कमाल
२२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com