दौंडमध्ये गव्हाचा बाजारभाव वधारला
दौंड, ता. २१ : दौंड तालुक्यात गव्हाची आवक घटली आहे. बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १३५ रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाची ३९८ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान २१०० तर कमाल ३२६० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात व यवत येथील उपबाजारात भुसार मालाची आवक कमी झाली. बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. पाटस उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात हरभऱ्याची ३६४० जुडी आवक होऊन, त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १२०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीची ९९८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल १५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८७१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ७०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
-----
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ३९८ २१०० ३२६०
ज्वारी ०५५ २००० ४५५१
बाजरी २७७ १७०० ३३००
उडीद ०४३ ४००० ५८१०
हरभरा ०१२ ४४०० ५३००
तूर ११८ ५५०० ७१११
मका १४६ १६०० २०००
भाजीपाला व फळांचा बाजारभाव (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-१४०, आले-५००, गाजर-२५०, पेरू-२००, काकडी-३३०, भोपळा-१५०, कोबी-२००, फ्लॅावर-५००, टोमॅटो-२५०, हिरवी मिरची-१०००, भेंडी-६००, कार्ली-७००, दोडका-९००, वांगी-३००, शिमला मिरची-५००, वटाणा-४००, गवार-७८०, घेवडा-२००, बिट-१५०, लिंबू-३००.
टोमॅटो, गाजर व भेंडीच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची २४५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २५० रुपये बाजारभाव मिळाला. गाजराची २५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी कमाल २५० रुपये, असा दर मिळाला.
केडगावमध्ये कांदा दरात वाढ
केडगाव उपबाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याची १०१२१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल २१०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

