दौंडला विषय समित्यावर 
‘नागरिक हित’चे वर्चस्व

दौंडला विषय समित्यावर ‘नागरिक हित’चे वर्चस्व

Published on

दौंड, ता. २३ : दौंड नगरपालिकेच्या सहा विषय समित्यांच्या सभापतिपदांवर संख्याबळानुसार नागरिक हित संरक्षण आघाडीच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपनगराध्यक्ष छाया थोरात यांच्यासह सरोज कांबळे, वैशाली माशाळकर, कार्तिकी सोनवणे, शहानवाज खान व नामिरा पानसरे यांची विषय समित्यांच्या सभापतिपदावर निवड झाली आहे.
दौंड नगरपालिकेच्या टाउन हॅाल कार्यालयात शुक्रवारी (ता. २३) पार पडलेल्या विशेष सभेत विषय समितीचे पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे व उपनगराध्यक्षा छाया थोरात या वेळी उपस्थित होत्या. दौंड नगरपालिकेत दुर्गादेवी जगदाळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून जनतेतून थेट नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या असून, त्यांनाही मताधिकार आहे. तर, सदस्यपदाच्या २६ जागांपैकी नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीचे १७ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ९, असे बलाबल आहे. संख्याबळानुसार नागरिक हित संरक्षण आघाडीच्या सदस्यांची समिती सभापतिपदांवर बिनविरोध निवड झाली.
मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी विषय समित्यांकरिता प्राप्त अर्जांची छानणी करून सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्यांची निवड बिनविरोधपणे झाल्याचे जाहीर केले.

नगरपालिका विषय समित्यांचे पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे :
पाणीपुरवठा समिती : सभापती- छाया थोरात (उपनगराध्यक्ष तथा पदसिध्द सभापती), सदस्य- रेणुका थोरात, वैशाली माशाळकर, वसीम शेख, विकास लोंढे, राणी लष्करे.
सार्वजनिक बांधकाम समिती : सभापती- सरोज कांबळे, सदस्य- योगेश कटारिया, ज्योती राऊत, शहानवाज खान, उज्ज्वला परकाळे, इंद्रजित जगदाळे.
स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती : सभापती- कार्तिकी सोनवणे, सदस्य- सागर जगताप, अथर्व सरनोत, शहानवाज खान, मंगेश चलवादी, मुकेश जगताप.
नियोजन व विकास समिती : सभापती- शहानवाज खान, सदस्य- रोहित पाटील, नीलेश पवार, मनिषा जाधव, स्वाती सावंत, जिवराज पवार.
महिला व बाल कल्याण समिती : सभापती- नामिरा पानसरे, सदस्या- रचिता कटारिया, ज्योती राऊत, रेणुका थोरात, प्रणिता शिंदे- जठार, स्वाती सावंत.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती : सभापती- वैशाली माशाळकर, सदस्य- विजय बोरकर, नीलेश पवार, रोहित पाटील, जिवराज पवार, राणी लष्करे.

स्थायी समिती पदाधिकारी
दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती आहेत. तर, उपनगराध्यक्षा छाया थोरात यांच्यासह विषय समिती सभापती सरोज कांबळे, कार्तिकी सोनवणे, वैशाली माशाळकर, शहानवाज खान व नामिरा पानसरे या समितीच्या पदसिद्ध सदस्य आहेत. या समितीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांच्यासह योगेश कटारिया व वसीम शेख यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com