

दौंड, ता. २५ : दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र फिरते न्यायवैद्यक वाहन (मोबाईल फॅारेन्सिक व्हॅन) उपलब्ध झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज या वाहनासाठी नियुक्त तज्ज्ञांच्या साहाय्याने संकलित केलेले पुरावे, रक्ताचे नमुने आदींचे योग्यप्रकारे जतन करून बारकोडद्वारे सीसीटीव्हीच्या नजरेखाली संरक्षण केले जाणार आहे. यामुळे गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढण्यास वेग येणार आहे.
दौंड पोलिस ठाण्यात या फिरते न्यायवैद्यक वाहनाचे पूजन करण्यात आले. मुंबई येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाने दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास हे वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दौंड, यवत व उरुळी कांचन पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे घडलेल्या ठिकाणचे पुरावे गोळा करण्याचे काम जलदगतीने व पारदर्शीपणाने पूर्ण होणार आहे. या वाहनातील न्यायवैद्यक पथकात दोन सहायक रासायनिक विश्लेषक आणि डिजिटल व सायबर गुन्ह्यासंबंधी पुरावे संकलन करण्यासाठी दोन वैज्ञानिक सहायक यांचा समावेश आहे.
स्फोटक पदार्थ तपासणी आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासणीकरिता वाहनात विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध आहेत. वाहनातील संपर्क यंत्रणेमुळे पोलिस, विविध तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. यावेळी दौंड उपविभागाचे उपअधीक्षक बापूराव दडस यांच्यासह पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, नारायण देशमुख आदी उपस्थित होते.
न्यायवैद्यक वाहनाची वैशिष्ट्ये
रक्त, केस, नख, कपडे आदींचे नमुने संकलन व जतन
स्फोटक व नार्कोटिक पदार्थांच्या नमुन्यांचे संकलन व जतन
डीएनए चाचणीसाठी आवश्यक पुराव्यांचे संकलन व जतन
सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा असलेली सुसज्ज व्हॅन
बोटांचे ठसे नोंदणी व तपासणी
संकलित नमुन्यांची शस्त्रीय तपासणीकरिता प्रयोगशाळा
04413
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.