दौंडमध्ये शेतीच्या विकासाला चालना
दौंड, ता. २८ ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दौंड तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध करून दिला. यातून तालुक्याचा चेहरामोहरा मोठ्या प्रमाणावर बदलला.
दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत - पाटबंधारे विभागाकडून जागा महसूल विभागाला हस्तांतरित करून त्याचे भूमिपूजन आणि लोकार्पण अजित पवार यांचे हस्ते झाले होते. प्रशस्त तीन मजली इमारत मध्ये तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालये कार्यरत आहेत.
आलेगाव (ता. दौंड) येथे नियोजित दौंड सहकारी साखर कारखान्याचे सन २००९ मध्ये अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शुगर लिमिटेड या खासगी कारखान्यात रूपांतर झाले होते. कारखान्यामुळे दौंड शहरासह तालुक्याच्या पूर्व भागाच्या शेतीला प्रामुख्याने चालना मिळाली. कारखान्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे झाल्याने शेतकऱ्यांना दळवळणाची सुविधा उपलब्ध झाली. कारखान्याकडून ऊस बेणे, माती परीक्षण, शिवार फेरी, लागवडी पासून तोडणीपर्यंतचे नियोजन केले जात असल्याने दौंड सह शेजारील शिरूर, श्रीगोंदा, इंदापूर व बारामती तालुक्यातून ऊस गाळपासाठी येत आहे.
दौंड शहरात अष्टविनायक मार्गावर दौंड पंचायत समिती इमारत बांधकामासाठी अजित पवार यांनी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास २० मार्च २०२० रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. एकूण ४१४१२ चौरस फूट क्षेत्रातील या प्रशस्त इमारतीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शेत रस्ते, व्यायामशाळा, ओपन जिम, खोलीकरण, रस्ता मजबुतीकरण, सभामंडप, आदींची कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत.
दौंड शहरातील रस्ते, कॉंक्रिटीकरण, व्यायामशाळा, पथदिवे, सांडपाणी व्यवस्था आदी विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. नानगाव ते वडगाव रासाई दरम्यान मुळा -मुठा नदीवर १३ कोटीचा उड्डाणपूल बांधला. कानगाव येथे २०१२मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजनांतर्गत २ कोटी ७९ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेमुळे गावातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली.
भीमा नदीवर वडगाव दरेकर - अजनुज ( जि. अहिल्यानगर) दरम्यान पूल उभारणीत योगदान. दोन जिल्हे जोडणाऱ्या पुलामुळे दळणावळणाची सुविधा उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची मोठी सोय झाली.
दिवंगत आमदार बाळासाहेब जगदाळे यांनी दौंड सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सहकारी कारखाना होऊ शकला नाही. त्यानंतर अजित पवार यांनी २००९ला दौंड शुगर साखर कारखान्याची स्थापना केली. या स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आणि या भागातील रस्ते वीज पाणी या सर्व गोष्टींचा विकास झाला.
बोरीबेल येथे एमआयटी संस्थेचे शैक्षणिक संकुल उभे राहत आहे. दौंड तालुका शिक्षणाच्या बाबतीत कुठे कमी पडू नये, यासाठी दूरदृष्टी ठेवून या शैक्षणिक संकुलाकरिता अजित पवार यांनी पुढाकार घेतला. तालुक्यातील शेती, सिंचन सुविधा, दळणावळणाची साधने, शैक्षणिक सुविधा, तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सढळ हाताने निधीची उपलब्ध करून दिला.
दृष्टिक्षेपात
-वरवंड येथे महानंद डेअरीचा दूध भुकटी प्रकल्प
-पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील पडवी, दौंड शहर, नानगाव येथे प्रशस्त विद्यालय इमारतींचे बांधकाम
-पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तालुक्यातील सर्व शाखा सुसज्ज व अद्ययावत करण्यासाठी पुढाकार
-वाटलूज येथे भीमा नदीवर दौंड व कर्जत ( जि. अहिल्यानगर) तालुक्यांना जोडण्यासाठी बंधारा प्रस्तावित.
-स्वामी चिंचोली येथे अजित पवार यांच्या वडिलांचे नाव असलेले `अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशस्त शैक्षणिक संकुलाचे २०२३ मध्ये उद्घाटन
-कानगाव येथे भीमा नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा
-कानगावमध्ये प्राथमिक उप आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

