‘दौंड शहराचा विकास करणे हीच अजितदादांना श्रद्धांजली’
दौंड, ता. ३० : ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौंड शहर विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचे ध्येय होते व त्यासाठी आराखड्याचे काम सुरू होते. त्यांना अपेक्षित अशा शहरविकास करिता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल,’’ असा शब्दांत दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दौंड नगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) दुपारी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या शोकसभेत बोलताना दुर्गादेवी जगदाळे यांनी ही भावना व्यक्त केली. अजित पवार यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा जगदाळे, उपनगराध्यक्ष छाया थोरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरपालिका सदस्य व अधिकारी आणि कर्मचारी वृंदाने पुष्पहार अर्पण करून फुले वाहिली.
अजित पवार यांची तत्परता, कार्यक्रमासाठी वेळेचे नियोजन, संवादकौशल्य, समोर आलेल्या माणसांची कामे वेळेवर करणे, कसलाही भेदभाव न करता काम पूर्ण करणे, आदी गुणवैशिष्ट्ये सदैव स्मरणात राहील. त्यांना हवी असलेली स्वच्छता आणि सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल, अशी भावना दुर्गादेवी जगदाळे यांनी व्यक्त केली.
नगरपालिकेचे सदस्य प्रणिता शिंदे, राजू बारवकर, स्वाती सावंत, ज्योती राऊत, जीवराज पवार, योगेश कटारिया व इंद्रजित जगदाळे यांनी या वेळी आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांनी अर्थमंत्री व पालकमंत्री म्हणून दौंड शहर व तालुक्याच्या विकासासाठी दिलेले योगदान, विकासकामाची दूरदृष्टी, कार्याचा व शिस्तीचा या वेळी प्रामुख्याने उल्लेख करीत सभागृहाने त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

