मोबाईल चोरीप्रकरणी दौंडमध्ये गुन्हा दाखल
दौंड, ता. ३१ : कोईमतूर-कुर्ला एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाच्या बॅगेतील दोन मोबाईल संच चोरीस गेले. आरक्षित डब्यात ही चोरी झाली. याबाबत दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात मंगळवारी ( ता. २७) अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराधा अनथ्या अल्लम (वय ३०, रा. इंदिरानगर, बांद्रा कोर्टाजवळ, मुंबई) या सोमवारी (ता. २६) कोईमतूर एक्सप्रेसने कृष्णा जंक्शन ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान गुलबर्गा ते दौंड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांना त्यांचा आसनाजवळ दोन मोबाईल संच असलेली सॅकबॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्या दोन मोबाईल संचाचे मूल्य २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत अनुराधा यांनी ऑनलाइन तक्रार नोंदविल्यानंतर हा चोरीचा गुन्हा तपासाकरिता दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

