दौंडमध्ये दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल
दौंड, ता. ४ : दौंड शहरात एका ट्रेलरला कार धडकवून ट्रेलर चालकालाच दमदाटी करणाऱ्या दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड शहरातील दौंड - गोपाळवाडी मार्गावरील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या पुणे प्रवेशद्वारासमोर सोमवारी (ता. २) हा प्रकार घडला. १४ चाकी ट्रेलर संथगतीने पुणे प्रवेशद्वारासमोरून जात असताना राज्य राखीव पोलिस दलाच्या मोटार परिवहन विभागातील अंमलदार संदीप शेषराव खेडकर व बुधा यशवंत गागरे यांनी त्यांच्या ताब्यातील भरधाव वेगातील खासगी कार ट्रेलरला धडकवली. मद्याच्या नशेत त्यांचे कारवरील नियंत्रण राहिले नाही. परंतु दोघांनी ट्रेलर चालकाला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्या दरम्यान तेथून जाणाऱ्या वाहनचालकांनी व नागरिकांनी हस्तक्षेप करत दौंड पोलिसांना कळविल्यानंतर एक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी ट्रेलर चालकाच्या फिर्यादीनुसार संदीप शेषराव खेडकर व बुधा यशवंत गागरे (दोघे रा. गट क्रमांक पाच वसाहत, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही पोलिसांनी मद्यपान केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांविरुद्ध इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे आणि बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

