दौंड बाजारात ज्वारी ५२११ रुपये क्विंटल

दौंड बाजारात ज्वारी ५२११ रुपये क्विंटल

Published on

दौंड, ता. १८ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक वाढली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल ८११ रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची ११४ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान १७०० तर कमाल ५२११ रुपये क्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात ज्वारीची ६० क्विंटल आवक होऊन त्यास किमान २००० रुपये; तर कमाल ४४०० रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ११ हजार ५११ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये तर कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ५४२५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रूपये, तर कमाल ८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूची ३५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल ६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची ७५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रूपये, तर कमाल ६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. हरभऱ्याची १८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० रूपये, तर कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.

दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर रुपयांत) : बटाटा- १४०, आले- ६००, गाजर- २५०, पेरू- २५०, काकडी- २५०, भोपळा- १८०, कोबी- १००, फ्लॅावर- २५०, टोमॅटो- १५०, हिरवी मिरची- १०००, भेंडी- ६००, कार्ली- ६१०, दोडका- ५००, वांगी- ४००, शिमला मिरची- ६००, वाटाणा- ३५०, गवार- १०००, घेवडा- ४५०, बीट- १५०, शेवगा- ६६०, चिक्कू- ३५०, लिंबू- ४५०, मका कणीस- १५०.

वांगी, कोबी, टोमॅटोच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात कोबीची ६८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० रुपये; तर कमाल १०० रूपये, असा दर मिळाला. टोमॅटोची २६१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० रुपये; तर कमाल १५० रूपये, असा दर मिळाला. वांग्यांची ४२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० रुपये; तर कमाल ४०० रूपये, असा दर मिळाला.

केडगावमध्ये कांद्याची आवक वाढली
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. कांद्याची १४ हजार २३३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये तर कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची १२ हजार ६१० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये तर कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com